Monday 26 December 2016

निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजि होय. आणि ज्या  विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र होय.
पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे , ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,  जीवशास्त्र, अभियांत्रिकी,भुगोल ,तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो.
दिवसेंदिवस मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्ती चे अतोनात नुकसान यामुळे पर्यावरणाची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज या  विषयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

Tuesday 13 December 2016

मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजना २०१६
प्रस्तावना :- वेगाने विकसित होत असलेल्या भारतामध्ये  तेवढ्याच वेगाने  शहरीकरण वाढलेले आहे. एकीकडे भौतिक विकासाचे प्रदर्शन  करणाऱ्या उत्तुंग इमारती तर दुसरीकडे ढासळत चाललेल्या जीवनदर्जाचे दर्शन घडवणाऱ्या झोपडपट्ट्या या बाबी संसाधनांच्या असमान वितरणाचे प्रतिक आहेत .
दुष्काळ व इतर  अडचणींमुळे ग्रामीण भागांतील हताश तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे अखंड ओघ लावीत आहेत आणि त्यातून वाढणाऱ्या नागरिकीकरणामुळे नव्याच समस्यांचा जन्म होत आहे . या पार्श्वभुमीवर ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ' खेडयांकडे चला ' या गांधीजींच्या मंत्राचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत होत आहे.
भविष्यातील जागतिक महासत्ता व एक तरुण देश म्हणून उदयाला येत असलेल्या भारतात ग्रामीण भागाचे योगदान महत्वपूर्ण असणार आहे. ग्रामीण भारतातील आव्हाने पेलण्याकरिता आम्हा तरुणांचे खांदे मजबुत असणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने महाराष्ट्रातील तरुणांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यानुभव व्हावा व भावी नेते, प्रशासक व कार्यकर्ते या नात्याने या तरुणांनी  महाराष्ट्राच्या व भारताच्या निर्माण कार्यात योगदान द्यावे, तसेच हे मॉडेल देशातील इतर राज्यांसाठी आदर्श व मार्गदर्शक रोल मॉडेल ठरावे हीच  दुरदृष्टी ठेवून मा. मुख्यमंत्री यांनी ' ग्रामविकास फेलों ' हा कार्यक्रम सुरु केला असावा.

  1. तुम्हला ग्राम विकास फेलों म्हणून का काम करायचे आहे ?
    :- ग्रामविकास फेलों या अत्यंत महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर काम करताना मिळणारे ज्ञान व येणारे अनुभव माझ्या व्यक्तीमत्व विकासात अत्यंत मोलाची भुमिका बजावणारे ठरू शकतात. प्रत्यक्ष ग्राऊंड लेवल ला जबाबदारी पार पाडताना येणारी आव्हाने, त्यांचा सामना करताना प्रगल्भ होत जाणारी व्यक्तीमत्व कौशल्ये जसे की ' निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, संघभावना व सहकार्य, व्यवस्थापन, संभाषण कौशल्ये ' ही माझ्या जडणघडणीत महत्त्वाची आहेत. शिवाय
    मला माझ्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजात राबवायला आवडेल, जेणेकरुन ग्रामीण समाज स्वयंपुर्ण बनेल.  ग्रामिण समाजजीवनाच्या विविध पैलूंचा जवळुन अनुभव असल्यानें भविष्यातील एक नेतृत्व,प्रशासक व कार्यकर्ता या नात्याने सामाजिक क्षेत्रात सुरुवातीपासूनच कार्यरत असलेल्या माझ्यासारख्या तरुणाला ही एक 'सुवर्णसंधी' वाटत आहे. मला ग्रामीण भारताच्या सर्वसमावेशक समतापूर्ण सामाजिक, आर्थिक व शाश्वत विकासात माझे योगदान द्यावयाचे असल्यामुळें मला ग्रामविकास फेलों म्हणून काम करायचे आहे.
  2. स्थानिक लोकांसाठी काम करण्याच्या हेतूने फेलोजची नेमणूक महाराष्ट्रातील दुर्गम भागात करण्यात येणार आहे; त्या अनुषंगाने तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत ज्यामुळे तुम्हाला वाटते कि तुम्ही अशा दुर्गम भागात काम करू शकाल?
    :- मी अगदी महाविद्यालयीन स्तरापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे, २०१३-१४ या कालावधी साठी "
    नेहरू युवा केन्द्र संगठन, सांगली. खेळ व युवक कार्यक्रम मंत्रालय,भारत सरकार " यांचे मार्फत माझी निवड 'NATIONAL YOUTH CORPS' या पदावर झाली होती, त्या अनुषंगाने मी माझ्या तालुक्यातील ८० पेक्षा जास्त गांवामधील युवा मंडळे आणि जिल्हा नेहरु युवा केन्द्र यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून उत्कृष्टरित्या जबाबदारी पार पाडलेली आहे. स्थानिक ग्रामीण युवकांच्या समस्या जाणून घेवून, त्यांना संघटीत व जागृत करुन अशा अनेक युवकांना मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी YUTH CLUBS च्या माध्यमातुन उपलब्ध करुन दिलेली आहे, या अंतर्गत युवकांसाठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहीती, शैक्षणिक व क्रीडा साहित्य पुरविणे तसेच त्यांना SKILL AND PERSONALITY DEVLOPEMENT PROGRAM , YOUTH AWARENESS PROGRAM, SAVE BABY GIRLS MOMENT, SPORT AND CULTURAL COMPITITION यांसारख्या ACTIVITIES मध्ये समाविष्ट करून त्यांच्या शक्तीला व कलागुणांना वाव देण्यासाठी मदत केलेली आहे.
    याच बरोबर 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) अंतर्गत विविध खेडेगांवात ७ दिवसांच्या निवासी शिबिरांमध्ये सेवा देणेचा अनुभव गाठीशी आहे, तसेच व्यायाम व ट्रेकींग ची आवड असल्याने खुपवेळा गड - दुर्ग भ्रमंती दरम्यान दुर्गम भागात राहिलेलो आहे.
    मी स्वतः ग्रामीण भागात घडलो असल्याने येथील समाजजीवनाशी व समस्यांशी मी जवळुन परिचित आहे, या क्षेत्रांतील प्रत्यक्ष काम करण्याचा पूर्वानुभव व मला वैयक्तिक या क्षेत्रामध्ये रस असल्यानें मी ग्रामविकास फेलों म्हणून उत्कृष्टरीत्या जबाबदारी पार पाडू शकतो.
  3. फेलोशिप कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा वापर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कशा पद्धतीने करू इच्छिता?
    :- या फेलोशिप कार्यक्रमामधून मिळणारे ज्ञान व अनुभव हे दुर्गम भागांतील आव्हानांचा सामना करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या प्रशासकीय व व्यक्तिकौशल्याच्या विकासामधे मोलाची भुमिका बजावतील, पर्यावरणशास्त्र विषयांतील उच्च पदवी नंतर मी प्रशासन,उद्योग,व्यवसाय, NGO यांसारख्या क्षेत्रांत काम करत असताना या अनुभवांचा उपयोग अधिक प्रभावीपणे कर्तव्य पार पाडण्याकरिता करू शकेन,
    उद्योग,कंपन्या व कार्पोरेट सेक्टर बरोबर काम करीत असताना CSR अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर दुर्गम ग्रामीण भागाच्या पुनरुत्थानासाठी अधिकाधिक प्रभावीपणे,परिणामकारक व सर्वसामावेशाकरित्या करण्यासाठी या अनुभवाचा उपयोग नक्की होऊ शकतो.
    ग्रामविकास फेलों म्हणून काम करतांना ग्राऊंड लेवल ला आलेले अनुभव माझ्यासारख्या युवकांना कौशल्यपूर्ण, कामाप्रती संवेदनशील व जबाबदार नागरिक बनवण्यात मदत करतील, व ग्रामीण भारताच्या विकासात व पुनरुत्थानामध्ये पूर्ण क्षमतेने त्यांचे योगदान देण्यात आणि भावी महासत्तेचे निर्माण करण्यात भूमिका पार पाडतील.